सहकार उद्यमी
व्यवसाय विकास केंद्र!

संपर्क साधा

आमच्या बद्दल

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अंगिक्रुत

सहकार उद्यमी :-

पतसंस्थानी केलेले कर्ज वाटप हे उद्योग निर्मिती, रोजगार निर्मिती व आर्थिक सक्षमतेसाठी वापरले जावे हे पाहणे पतसंस्थानचे आद्य कर्तव्य आहे.

यासाठी पतसंस्थांच्या महिला व युवा सभासद उद्योजकांना व्यवसायांचे तंत्र, प्रशिक्षण, उत्पादन निवड प्रक्रिया, कच्चा माल खरेदी, उत्पादन प्रक्रियेचे प्रशिक्षण, गुणवत्ता नियंत्रण, पॅकेजिंग व ब्रँडिंग, मार्केटिंग इत्यादिबाबत सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे.

पतसंस्था चळवळीच्या इतिहासातील "सहकार उद्यमी" हे एक सुवर्ण पान ठरावे असाच हा एक उपक्रम आहे। पतसंस्थानी या उपक्रमात आवर्जून सहभागी व्हावे, हेच नम्र आवाहन.

MAFCOCS

आपल्या सर्वांचा ब्रॅण्ड

"MAFCOCS" या ब्रँडनेम अंतर्गत वर्ल्ड ऑर्गनायझेशन ऑफ क्रेडिट युनियन (WOCU), एशियन कॉन्फफेडरेशन ऑफ क्रेडिट युनियन (ACCU) तसेच ग्लोबल वूमन लीडरशिप नेटवर्क (GWLN) या आंतराष्ट्रीय संघटनेसोबत व्यापारी सहकरिता असणार आहे।.

ब्रँडची वैशिष्ट्ये :-

ग्राहक हितासाठी आरोग्यदायी जीवनशैलीच्या दृष्टीकोनातून वस्तू आणि सेवांची उत्पादने व निर्मिती.

गरिबी निर्मूलन, रोजगार निर्मिती, आर्थिक सक्षमता हे ध्येय साध्य करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन अंगीकृत उपक्रम म्हणजेच "सहकार उद्यमी" हे व्यवसाय विकास केंद्र सुरू करण्यात आले आहे.