MAFCOCS

आपल्या सर्वांचा ब्रॅण्ड

ब्रँडची वैशिष्ट्ये :-

ग्राहक हितासाठी आरोग्यदायी जीवनशैलीच्या दृष्टीकोनातून वस्तू आणि सेवांची उत्पादने व निर्मिती.

गरिबी निर्मूलन, रोजगार निर्मिती, आर्थिक सक्षमता हे ध्येय साध्य करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन अंगीकृत उपक्रम म्हणजेच "सहकार उद्यमी" हे व्यवसाय विकास केंद्र सुरू करण्यात आले आहे.

सहकार उद्यमी :- सहकार उद्यमी म्हणजे चवलीतील उद्योजकांसाठी मितवा : म्हणजे मित्र, तत्वज्ञ, वातड्या(मार्गदर्शक) असणार आहे. उद्योजकांना त्यांच्या उद्योग सुरू करण्यापासून ते संबंधित उद्योग आर्थिकदृष्ट्या सक्षम होई पर्यंत सहकार उद्यमी मार्गदर्शक राहणार आहे.सहकार उद्यमी संरचना पुढील प्रकारे असणार आहेपतसंस्थानची भूमिका :-

ज्या पतसंस्थांना या उपक्रमात सहभागी व्हायचे असेल त्यांनी नोंदणी करणे आवश्यक आहे.

नोंदणीकृत पटसंस्थेतील दोन कर्मचारी तसेच एका जवाबदार संचालकास प्रशिक्षण देण्यात येऊन त्यांची पतसंस्था पातळीवर व्यवसाय विकास केंद्र सुरू करून उद्योजक सभासद व सहकार उद्यमी सोबत समवयस्क म्हणून कार्य करावयाचे आहे."MAFCOCS" या ब्रँडनेम अंतर्गत वर्ल्ड ऑर्गनायझेशन ऑफ क्रेडिट युनियन (WOCU), एशियन कॉन्फफेडरेशन ऑफ क्रेडिट युनियन (ACCU) तसेच ग्लोबल वूमन लीडरशिप नेटवर्क (GWLN) या आंतराष्ट्रीय संघटनेसोबत व्यापारी सहकरिता असणार आहे.

प्रशिक्षण :- सभासद उद्योजकांना तज्ञ / अनुभवी व्यक्ती मान्यता प्राप्त संस्था यांच्या मार्फत प्रशिक्षण देण्यात येईल. 'सक्षम सभासद म्हणजे सक्षम पतसंस्था आणि पर्यायाने सक्षम फेडरेशन' हे सूत्र यशस्वी होण्यासाठी सहकार उद्यमी कार्यरत असणार आहे.

'उद्योग विकासासाठीचे तंत्र हाच सभासदाना द्यावयाचा मंत्र' राबवणे आवश्यक आहे यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष, मा. काकासाहेब कोयटे यांच्या नेतृत्वाखाली व समानिय संचालक मंडळाच्या मार्गदर्शनानुसार राज्यस्तरीय व्यावसायिक विकास केंद्र स्थापन केले असून Center For Smart Coop Developments या संस्थेस अधिकृत प्रतिनिधि म्हणून नेमले आहे.

पतसंस्था चळवळीच्या इतिहासातील "सहकार उद्यमी" हे एक सुवर्ण पान ठरावे असाच हा एक उपक्रम आहे। पतसंस्थानी या उपक्रमात आवर्जून सहभागी व्हावे, हेच नम्र आवाहन.