आमच्या बद्दल

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अंगिक्रुत

भारत हा नेहमीच कुशल कारागिरांचा देश आहे. पारंपरिक उद्योग आणि आधुनिकता यांची सांगड घालून भारतातील छोटे उद्योग सक्षम व्हावेत, तसेच त्यायोगे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती होऊन आर्थिक प्रगती साधावी, दैनंदिन जीवन सुसाह्य व्हावे, या शाश्वत विकासासाठी भारतभर शासकीय तसेच अशासकीय विकास प्रशिक्षनाचे कार्य करीत अहेत. मात्र प्रशिक्षणासोबतच वित्त पुरवठा, उत्पादनाचा दर्जा व विक्री व्यवस्थापन यासाठी सहकार उद्यमी हा एक सक्षम पर्याय आहे.

सहकार उद्यमी :-

पतसंस्थानी केलेले कर्ज वाटप हे उद्योग निर्मिती, रोजगार निर्मिती व आर्थिक सक्षमतेसाठी वापरले जावे हे पाहणे पतसंस्थानचे आद्य कर्तव्य आहे.

यासाठी पतसंस्थांच्या महिला व युवा सभासद उद्योजकांना व्यवसायांचे तंत्र, प्रशिक्षण, उत्पादन निवड प्रक्रिया, कच्चा माल खरेदी, उत्पादन प्रक्रियेचे प्रशिक्षण, गुणवत्ता नियंत्रण, पॅकेजिंग व ब्रँडिंग, मार्केटिंग इत्यादिबाबत सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे.

उद्दिष्ट :-

शाश्वत विकासाच्या जागतिक धोरणानुसार गरिबी निर्मूलन , स्त्री पुरुष समानता, आर्थिक विकास साधण्यासाठी महिला व युवावर्ग उद्यममशील व्हावेत.

आर्थिक विकासासोबत रोजगार निर्मिती व्हावि.

सर्वसामान्य जनतेचे जीवनमान उंचावण्यात यावे.


ध्येय :-

महाराष्ट्र राज्य संस्था फेडरेशन अंतर्गत व्यवसाय विकास केंद्र सुरु करणे.

या केंद्राची संरचना, व्याप्ती व पद्धत कशी असावी, याबाबत नियमावली तयार करणे.
आर्थिक तरतूद करण्यासाठी प्रारूप आराखडा तयार करणे.
या संस्थेत सभासद पतसंस्थाचे सहभागीत्वा वाढविण्यासाठी योजना तयार करणे.
प्रशिक्षणाचे स्वरूप व त्यासाठी लागणारे माध्यम याची निर्मिती करणे.
तज्ज्ञ, तंत्रण्य इ. सल्लागारारांची यादी तयार करणे, त्यांचे मानधन, फी ठरवणे.


जिल्हास्तरीय व्यवसाय विकास केंद्र स्थापन करणे.

जिल्हा स्तरीय किंवा पतसंस्था पुढाकाराने विविध उद्योग सुरु करणे.
महिला व युवावर्ग करीत असलेल्या उद्योगास विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देणे.
हे व्यवसाय यशस्वीरीत्या चालविण्यासाठी मार्गदर्शन करणे.


पतसंस्था पातळीवर व्यवसाय विकास सेवाकेंद्र स्थापन करणे.

पतसंस्थेतील कायमस्वरूपी सेवेतील २ ते ४ कर्मचारी, पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, या योजनेसाठी जवाबदार संचालक यांना प्रशिक्षण देणे.
संबंधित पतसंस्थेतील उद्योजक सभासदांना त्यांचा व्यवसाय अधिक सक्षम करण्यासाठी व्यवसाय कौशल्याकरिता प्रशिक्षण देणे.
ज्या सभासदांना नवीन उद्योग सुरु करावयाचा असून, संस्थेकडे कर्ज मागणी केलेली असेल, त्या सभासदांना नवीन उद्योगासाठी तंत्रन्यान, वित्त पुरवठा व बाजारपेठ उपलब्धता तसेच व्यावसायिक कौशल्य यासाठी प्रशिक्षण देणे.
उद्योग समूहात सहभाग घेण्यासाठी पतसंस्थांच्या सभासदांना उद्युक्त करणे.


OCOP (One Co-operative One Product) : (एक पतसंस्था एक उत्पादन) :-

या तत्वावर उद्योग (Cluster) निर्मिती करण्यासाठी सुद्धा "सहकार उद्यमी" हे पुढाकार घेऊन मार्गदर्शन करतील.

सभासद उद्योजकांना सर्वंकष प्रशिक्षण त्यासाठी उपलब्ध वित्तपुरवठा, प्रत्यक्ष उत्पादन निर्मिती, प्रक्रियेत सहभाग, गुणवत्ता नियंत्रण, पॅकेजिंग, ब्रँडिंग "MAFCOCS" या ब्रँड अंतर्गत Local to Global, Traditional to Digital मार्केटिंग यंत्रणा उपलब्ध करून देणार आहेत.